पुणे विभागात 39 हजार 734 स्थलांतरित मजुरांची सोय तर 1 लाख 12 हजार 190 मजुरांना भोजन -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0
पुणे दि. 27 : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 399 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 553 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 39 हजार 734 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 12 हजार 190 मजुरांना भोजन देण्यात येत आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


पुणे विभागात 40 हजार 521 क्विंटल अन्नधान्याची तर 12 हजार 904 क्विंटल भाजीपाल्याची आवक
सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 40 हजार 521 क्विंटल अन्नधान्याची तर 12 हजार 904 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 805 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 23 हजार 619 क्विंटल इतकी झाली आहे. पुणे विभागात 26 एप्रिल 2020 रोजी 98.774 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.221 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले असल्याची डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top