शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करणार

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज | निघोज | प्रतिनिधी- सागर आतकर

शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही अनावश्यक खर्च न करता काहीतरी समाजउपयोगी उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन व नियोजन सर्व मित्र परीवाराच्या वतीने करण्याचे ठरले. त्यानुसार गरीब विदयार्थाना शालेय साहित्य वाटप करण्याचे जाहीर करण्यात आहे.


वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे केक, शाल ,बुके न आणण्याचे आवाहन शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांच्याकडून यावेळी करण्यात आले होते. त्यानुसार फक्त शुभेच्छाचे आदानप्रदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व शालेय साहित्य जुन मध्ये शाळा सुरु झाल्यानंतर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी या उपक्रमाला निघोज ग्रामीण चे चेअरमन मा. वसंत कवाद सर यांनी आर्थिक मदत करून सुरवात केली. जि आर एल कन्स्ट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे यांच्या हस्ते ती मदत स्वीकारण्यात आली.

या सामाजिक उपक्रमाची सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सामाजिक जाणीव असलेल्या या युवकाचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top