पारनेर तालुका सलून दरात २०% वाढ; १ जुलै २०२६ पासून नवे दर लागू; नाभिक बांधवांनी मांडली आपल्या संसाराची व्यथा!

0

 


महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर:
           वाढत्या महागाईचा भडका आता सर्वच क्षेत्रात उडाला असून, या झळांमधून सलून व्यवसाय देखील सुटलेला नाही. पारनेर तालुक्यातील सलून व्यावसायिकांनी सेवा दरात २० टक्के दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा नवा दर १ जुलै २०२६ पासून संपूर्ण तालुक्यात अमलात येणार आहे. काल पारनेर येथे तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष श्री. भाऊ बिडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सलून व्यावसायिकांची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत महागाईवर सविस्तर चर्चा करून हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

"वर्षानुवर्षे कमी नफ्यात सेवा देणाऱ्या नाभिक समाजाने काही रुपये वाढवले म्हणून टोमणे मारणाऱ्यांनी एकदा तरी त्या कारागिराच्या घरातील वास्तव पहावे."— श्री. भाऊ बिडे (तालुका अध्यक्ष)

या बैठकीला पारनेर तालुका नाभिक संघटनेचे सचिव श्री. सुनील आतकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. शामकांत जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. शाम साळुंके, पारनेर शहर सलून अध्यक्ष श्री. करण कार्ले, उपाध्यक्ष समीर कार्ले, सचिव श्री. नवनाथ काळे, संजय कार्ले, विजुशेठ कार्ले, प्रमोद सोनवणे, संजय वाघचौरे, संजय जाधव, राहुल काळे, नवनाथ कुटे 
संजय वाकचौरे, प्रसाद भोसले, अरुण वाकचौरे, प्रणव काळे, अल्ताफ खान, समीर कार्ले - खजिनदार, संजय जाधव, राहुल काळे, नवनाथ काळे, बाबा राऊत, प्रमोद सोनावणे, संजय कार्ले, ज्ञानेश्वर कोरडे, निळू कोरडे, स्वप्नील कोरडे, संतोष वाघमारे, विशाल कोरडे, दादा बिडवे, कार्तिक गायकवाड, गणेश कोरडे, योगेश काळे, अमोल काळे, दत्तात्रय राऊत, कैलास कार्ले, सागर कार्ले, अनिकेत साबळे, माऊली काळे

यांसह तालुक्यातील अनेक नाभिक बांधव व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
"दोन रुपयाच्या ब्लेडचा हिशोब मांडणाऱ्यांनी नाभिकांच्या संसाराचा हिशोब पण मांडावा. कात्री फक्त केस कापत नाही, तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असते. त्यात आता परप्रांतीयांच्या व्यवसायातील अतिक्रमणामुळे स्थानिक समाज पूर्णपणे मेटकुतीला आला आहे."
— श्री. शाम साळुंके (तालुका उपाध्यक्ष)


 

"ज्याला स्वतःच्या कलेच्या जोरावर संसार चालवायचा आहे, त्याला दरवाढ करण्याची हौस नसते तर मजबुरी असते."— श्री. सुनील आतकर (सचिव) आणि श्री. करण कार्ले (शहर अध्यक्ष)





    बैठकीत नाभिक बांधवांनी दरवाढीमागची आपली गंभीर कारणे स्पष्ट केली:

  1. साहित्याचे गगनाला भिडलेले भाव: सलूनसाठी लागणारे रोजचे साहित्य, ब्रँडेड कॉस्मेटिक्स आणि सौंदर्य प्रसाधनांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.
  2. दुकान भाडे आणि वीज बिल: व्यावसायिक गाळ्यांचे भाडे आणि व्यावसायिक वीज बिल यामध्ये मोठी वाढ झाल्याने गल्ला भरणे कठीण झाले आहे.
  3. भूमिहीन समाज आणि घरखर्च: नाभिक समाजातील बहुतांश बांधव हे भूमीहीन आहेत. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह केवळ आणि केवळ याच व्यवसायावर अवलंबून आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्च, दुकानाचे हप्ते आणि आजारपण यांसारखा अचानक येणारा खर्च भागवणे सध्याच्या दरात अशक्य झाले आहे.

 

सुज्ञ ग्राहकांना सहकार्याचे आवाहन: 
"सर्वच व्यवसायांमध्ये काही महिन्यांपूर्वीच दरवाढ झाली आहे, त्यामुळे आमच्या या निर्णयामुळे ग्राहकांवर थोडा भार पडणार असला तरी आमचाही नाईलाज आहे. आमचा ग्राहक सुज्ञ आहे, तो परिस्थिती जाणून आहे आणि आम्हाला नक्कीच चांगला रिस्पॉन्स देईल," असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. १ जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या या नव्या दरांना तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पारनेर तालुका नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top