स्व.श्री शांताराम(मामा)भाऊ लंके यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सव

0

Maharashtra Darshan News / Parner- Nighoj : 

            वारकऱ्यांना जीव लावण्यात आणि त्यांना जेऊ घालण्यात मामांना मोठा आनंद मिळत असे. ते कधीही वारकऱ्यांची जात, पात किंवा नाव विचारत नसत. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. असे हभप संजय महाराज धोंडगे यांनी दिवंगत शांताराम मामा लंके यांच्याबद्दल आठवणी सांगताना सांगितले. यावेळी त्यांनी मामांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा गौरव केला. 

शांताराम मामांनी प्रतिकूल परिस्थितीत कन्हैय्या मिल्क प्रॉडक्टचे मोठे साम्राज्य उभे केले. अत्यंत शांत आणि प्रेमळ स्वभावाचे मामा हे माझ्या जीवनातील पहिलेच प्रभावी व्यक्तिमत्व होते. दोन भावांपैकी राम असलेल्या शांताराम मामांनी आपल्या निधनापूर्वी लक्ष्मण स्वरूप बबनभाऊंकडे हा सर्व व्याप सोपवला. त्यांच्या नावात राम तर आडनावात लंके असले तरी, रावणाचे कधी पुण्यस्मरण होत नाही मात्र शांताराम मामांच्या कार्यामुळे त्यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. ज्ञानदानासोबतच अन्नदानाचे पुण्य या परिवाराने साधले असून ते नेहमी देणारे राहिले आहेत, घेणारे नाहीत असेही महाराजांनी नमूद केले.

महाराजांनी पुढे प्रपंचातील परमार्थ आणि मानवी जीवनाचे महत्त्व विषद केले. केवळ दाखवण्यासाठी परमार्थ करू नका, कारण संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांना कोणीही फसवू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मृत्युला घाबरण्याऐवजी त्याला आपलेसे करा, कारण वारकरी संप्रदायात मृत्यूचा सोहळा मानला जातो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पारनेर तालुक्यातील निघोज येथे कन्हैया उद्योग समूहातर्फे कन्हैय्या परिवाराचे संस्थापक दिवंगत शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह. भ. प.  संजय महाराज धोंडगे यांची तिसऱ्या दिवाशीचे कीर्तन सेवा झाली. यानिमित्ताने कन्हैय्या परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, कर्मचारी आणि पारनेर व शिरूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top