- पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- निघोजच्या जल- जीवन मध्ये झोल
पारनेर | प्रतिनिधी
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठ्या निघोज गावासाठी राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेमध्ये झोल झाला आहे. या योजनेसाठी ठेकेदाराने आणलेल्या ४५ पाईपची चोरी झाली असून याप्रकरणी ठेकेदार आदेश कोठारी रा. नगर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोट्यावधी रूपये खर्चाच्या या पाणी योजनेचे काम आदेश कोठारी यांनी घेतले असून निघोज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिरसुले येथील गंगाराम भिकाजी घोगरे यांच्या वस्तीवर कुकड़ी कालव्यानजीक कोठारी यांनी या योजनेसाठी लागणारे पाईप ठेवाने होते.
कोठारी यांचे मित्र सचिन विठ्ठल ढवळे रा. खांडगांव ता. श्रीगोंदे हे १० मार्च रोजी शिरसुले येथे गेले असता घोगरे वस्तीवर ठेवण्यात आलेल्या डी आय के ७ या १२६ पाईपपैकी २५ पाईप आढळून आले नाही.
कोठारी व त्यांचे सहकारी सचिन ढवळे यांनी आजूबाजूला शोध घेऊनही पाईप आढळून न आल्याने त्यांची चोरी झाल्याची खात्री पठन्यानंतर कोठारी यांनी गुरुवारी पारनेर पोलीस ठाण्यात येत फिर्याद दाखल केली. जल जीवन मिशन योजनेमध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप खासवार नीलेश लंक हे संसदेमध्ये करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पारनेर तालुक्यात या योजनेच्या पाईपची चोरी झाल्याने तालुक्यात एकच साळबळ उडाली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद