निघोज : प्रतिनिधी
जगप्रसिध्द रांजणखळगे परिसराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५०कोटी रूपये खर्चाच्या आराखडयासाठी शासनाने निधी मंजुर करण्यासंदर्भात आ. काशिनाथ दाते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली मागणी स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन अॅड. बाळासाहेब लामखडे यांनी केले.
निघोज ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यामातून मुक्का मळा येथील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याचे भूमिपुजन अॅड. लामखडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
निघोज परिसरात ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जनतेशी समन्वय साधून विकास साधला- अॅड. लामखडे
यावेळी बबुशा वरखडे, भगवान लामखडे, रामदास रसाळ, मंगेश लाळगे, पांडूरंग लामखडे, शंकर वरखडे, बाबाजी वाघमारे, भाऊसाहेब लामखडे, दिलीप ढवण, संतोष लामखडे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, अस्लम इनामदार, सुनील लामखडे, उत्तम लामखडे, शत्रुघ्न लामखडे, विठ्ठल वरखडे, विनायक रसाळ, बबनराव वरखडे, गोरख लामखडे, ज्ञानदेव वरखडे, आनंदा वराळ, महादू लामखडे, बबनराव लामखडे, सुदाम वरखडे, भिमा शिंदे, रामदास वाबळे, अशोक वरखडे, अनिकेत लंके, स्वप्नील लामखडे, शुभम शिंदे, निवृत्ती वरखडे, अक्षय वरखडे, विनायक कवाद आदी उपस्थित होते. उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी सुत्रसंचलन तर शंकर वरखडे यांनी आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद