महाराष्ट्र दर्शन न्यूज | निघोज | प्रतिनिधी : सागर आतकर
शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी पारनेर तालुक्यातील निघोज येथील शरदचंद्र पवार अभ्यासिकेस भेट देत पाच हजार रूपयांची देणगी दिली. या अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याच्या भावना गाडीलकर यांनी व्यक्त केल्या. तसेच या अभ्यासिकेसाठी पुढील वेळी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके आपण भेट देणार असून या अभ्यासिकेसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
या निमित्ताने शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांचा अमृताशेठ रसाळ, रामदास वरखडे, शंकरराव लामखडे, बबनराव ससाणे, अशा वरखडे, भगवान पांढरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गोरक्षनाथ गाडीलकर बोलताना म्हटले की, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. निघोज परिवाराचे मार्गदर्शक बाबासाहेब कवाद यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपुर्ण योगदान दिले. सर्वसामान्य जनतेला आधार मिळावा यासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून प्रसादालय सुरू केले असून याचा शेकडो लोकांना लाभ होत आहे.
विश्वस्त शंकरराव लामखडे यांनी सुत्रसंचलन केले तर बबनराव ससाणे यांनी आभार मानले.
मळगंगा ट्रस्टला मार्गदर्शन करावे
अतिशय प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत गोरक्षनाथ गाडीलकर हे राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवेत दाखल झाले असून आज ते वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत पोहचले ही तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. शिर्डी संस्थानच्या विकासात गाडीलकर यांचे मोठे योगदान असून त्यांनी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टलाही मार्गदर्शन करावे.- अमृताशेठ रसाळ( कोषाध्यक्ष मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद