निघोज-अळकुटी गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले- आ.काशिनाथ दाते

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज | पारनेर | प्रतिनिधी - सागर आतकर

            विधानसभा निवडणुकीत निघोज-अळकुटी जिल्हा परिषद गटात चांगले मताधिक्य मिळाल्याने आमदार होण्याची संधी मिळाली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्लीतील राजकीय दबदबा वाढण्यासाठी सर्वाधिक संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे सभासद व्हा, असे आवाहन आ. काशिनाथ दाते यांनी केले आहे.


शिवसप्ताह निमित्ताने पक्षाचे सभासद वाढवीण्याचे धोरण पक्षपातळीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतले आहे. या सुचनेनुसार आ. काशिनाथ दाते व पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत याच्या वतीने सोमवार दि. 24 रोजी दुपारी पाच वाजता अळकुटी व सायंकाळी सात वाजता निघोज येथे पारनेर तालुका राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद होते.
 
सुधामती कवाद यांच्या कामाचे कौतुक

महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद यांनी बैठकीसाठी सर्वाधिक महिलांना उपस्थीत ठेवले. तसेच सर्वांनाच व्यक्तीगत संपर्क करुण बैठकीस उपस्थित राहाण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आशाताई निंबाळकर यांनी कवाद यांचे कौतुक केले.

माघील निवडणुकीत निघोज-अळकुटी गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र मध्यंतरी परिस्थिति बदलली होती. राष्ट्रवादीमध्ये दुफळी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रीगणात उतरले. त्यामुळे काय होणार ही उस्तुकता सर्वांनाच लागली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पुन्हा निघोज-अळकुटी गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले- आ.काशिनाथ दाते

प्रस्थापित पुढारी पक्ष प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार,आ. काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी पक्ष प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उद्याच्या काळात मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. यामध्ये आणखीन भर टाकण्याची जबाबदारी कार्यकर्त्याची आहे. – अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मळगंगा यात्रेनिमित्त १० एप्रिल रोजी पाणी सोडा

मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त अनिल लंके यांनी आ. काशिनाथ दाते यांनी कुकडी डावा कालव्याला वेळेवर पाणी सोडण्याचा पाठपुरावा केला म्हणून आमदार दाते सर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावेळी लंके यांनी दि.२१ एप्रिल पासून राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा सुरू होत असून पाटपाण्या अंतर्गत असलेल्या गावात यात्रा असून भावीकांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी पुन्हा दि. १० एप्रिल रोजी पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, जिल्हा सरचिटणीस ॲड. बाळासाहेब लामखडे, महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव लंके, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय लाळगे, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवा तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रावडे, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, अनिल लंके, विठ्ठलराव कवाद, युवा नेते रमेश वरखडे, शिवाजीराव सुकाळे, माजी सरपंच पांडुरंग येवले, संचालक शांताराम कवाद, शिवराज कदम, राजेंद्र ब्राम्हणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लंके यांनी केले तर रोहिदास लामखडे यांनी आभार मानले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top