श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

0


श्रीरामपूर/ महाराष्ट्र दर्शन न्यूज

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.

भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले. 

मृतांमध्ये शहरातील प्रसिद्ध हॉटेल चालकाच्या मुलाचा समावेश असल्याचे समजते. ही माहिती समोर येताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा ताबा सुटणे हे प्राथमिक कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top