निघोज येथे वै. ह.भ.प. रामदास बाबा दुसाने यांच्या पुण्यस्मरणनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

0
महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज /प्रतिनिधी-सागर आतकर 
         पारनेर तालुक्यातील निघोज येथील ह.भ.प.भाऊसाहेब महाराज कोल्हे व दिंडी सोहळा कमिटीच्या वतीने वै. रामदास बाबा दुसाणे यांच्या २० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार दि.१० ते शुक्रवार दि.१४ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.भास्करराव शिरोळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विना पूजन करण्यात आले. यनिमित्ताने जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे नेते तथा अहिल्यानगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे, संतोषशेठ साबळे, बबुशा आण्णा वरखडे, संतोषशेठ रसाळ, सोमनाथ वरखडे, देवराम लामखडे, आप्पाशेठ लामखडे, सोमनाथ भाकरे, विजय भाकरे, रंगनाथ ढवण, कचरु वरखडे, आबा भुकन, नवनाथ रसाळ, बाळू काका देशपांडे, गोरक्षनाथ भाकरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top