पाटोदा (प्रतिनिधी)- जरेवाडी गावात हनुमान खामकर यांच्या राहत्या घराला लागलेल्या आगीत काही क्षणांतच सर्व काही जळून खाक झाले. कष्टाने उभारलेले घर, संसाराचा प्रत्येक कोपरा क्षणभरात राखेत परिवर्तित झाला. डोळ्यांसमोर आयुष्यभराची जमा-पूंजी जळताना पाहून खामकर कुटुंबाचे डोळे अश्रूंनी भरून आले.या दुःखाच्या काळात अंमळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते भाऊसाहेब आण्णा भवर यांनी गावात येऊन जळीतग्रस्त कुटुंबाला भेट दिली. त्यांनी आधाराचा हात देत मनापासून दिलासा दिला. त्यांच्या चेहऱ्यावरची माया आणि आपुलकी पाहून कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंऐवजी कृतज्ञतेचे पाणी दाटले. भाऊसाहेब आण्णा भवर यांनी संकटग्रस्त कुटुंबाला ₹21,000/- ची आर्थिक मदत देत माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला. त्यांनी केवळ पैशांनी नव्हे, तर आपल्या उपस्थितीने आणि मनःपूर्वक शब्दांनी जखमी मनांना मलम लावले. “आगीत आमचं सर्व काही गेलं, पण भाऊसाहेबांनी दिलेला आधार आम्हाला नवसंजीवनी देऊन गेला,” असे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी खामकर यांनी सांगितले. गावकऱ्यांनी एकमुखाने म्हटलं “संकटात माणसाची ओळख होते, आणि भाऊसाहेब आण्णा भवर यांनी खरी माणुसकी दाखवली !”
जरेवाडीतील आगीत खामकर यांच्या घराची झाली राख भाऊसाहेब आण्णा भवर बनले आधाराचा हात !
ऑक्टोबर १५, २०२५
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद