सभासद, सेवकांच्या खात्यावर एक कोटी तीन लाख लाभांश जमा

0

निघोज । महाराष्ट्र दर्शन न्यूज 

            बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेने यंदाही दिवळीपूर्वी आपल्या सभासद आणि सेवकांसाठी भरघोष लाभांश आणि सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. एकूण एक कोटी तीन लाख रुपयांची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, यामध्ये १२ टक्के दराने लाभांश व १५ टक्के सानुग्रह अनुदानाचा समावेश आहे. यासोबतच सर्व सेवकांना दिवाळी फराळासाठी किराणा कीटही देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी दिली.

व्हा. चेअरमन नामदेव थोरात व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मासिक बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर १२ टक्के दराने एकूण ७१ लाख ३८ हजार रुपयांचा लाभांश जमा करण्यात आला आहेत. तर १५ टक्के दराने ३२ लाख २० हजार सानुग्रह अनुदान सेवकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. याशिवाय, ९४ सेवकांना प्रत्येकी २ हजार रुपये किमतीची दिव-आहे. दिवाळी किराणा कीट वाटप करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सभासद व सेवकांमध्ये समाधानाचे वातावरण असून संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

बैठकीस संस्थेचे संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लाम खडे, दामू लंके, बाबाजी कळसकर, शांताराम कळसकर, सुनील मेसे, बाळिशराम डेरे, अभिजीत मासळकर, भीवा रसाळ, सतीश साळवे, दिलीप सोदक, लताबाई कवाद, वैशाली कवाद, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, जनरल मॅनेजर संपतराव ठुबे, उपव्यवस्थापक शांताराम सुरकुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम कळसकर यांनी केले दत्तात्रय लंके यांनी आभार मानले.

पतसंस्थेचे सर्वसामान्यासाठी लोकहितार्थ निर्णय

        गेल्या २५ वर्षांपासून बाबासाहेब कवाद पतसंस्थेने सर्वसामान्य जनतेसाठी लोकहितार्थ निर्णय घेऊन त्यांच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. संस्थापक बाबासाहेब कवाद यांच्या नेतृत्वाखाली व संचालक मंडळाच्या प्रयत्नांतून ही संस्था आज विश्वासार्हतेने उभी आहे. चेअरमन वसंत कवाद व त्यांच्या सहकाऱ्यांचे नियोजन, पारदर्शकता व लोकाभिमुखता यामुळे संस्था सातत्याने प्रगतिपथावर आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक जनतेतून उमटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top