- डिजिटल इंडियाचा फज्जा: निघोजमध्ये नेटवर्कअभावी संपर्काची 'कसरत'.
महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज :
मोबाईल आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, जो संवाद, माहिती, शिक्षण, मनोरंजन आणि आर्थिक व्यवहारांसाठी (यूपीआय, बँकिंग) अत्यंत महत्त्वाचा आहे. स्मार्टफोन्समुळे जग जवळ आले असून, ऑफिसचे काम, ऑनलाइन खरेदी आणि आपत्कालीन सेवा अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत.
मोबाईल टॉवर मध्ये वारंवारच्या बिघाडामुळे जिओ तसेच इतर कंपनीचे सिम कार्ड असलेल्या मोबाईलचे सुद्धा नेटवर्क गुल होत आहे. नेटवर्क नसल्याने पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील हजारो ग्राहकांच्या महत्वाच्या कामांना अडथळा येत असल्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क कधीही जात असल्याने इंटरनेट, कॉलिंग सेवा बंद झाल्याने व्हाट्सअप, समाज माध्यमांपासून संपर्काच्या अन्य सेवा चालत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. नेटवर्क सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद