1500 रुपये जमा झाले... लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..

0




महाराष्ट्र दर्शन न्यूज / मुंबई: 

            मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांना पैसे मिळाले नाही. मात्र आता पात्र महिलांच्या खात्यात सोमवारी पैसे जमा झाले.

आजचे विशेष अपडेट (२४ फेब्रुवारी २०२६):
राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात आजपासून जानेवारी महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांचे मागील हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले होते, त्यांच्या खात्यात एकत्रित रक्कम देखील जमा होत असल्याचे दिसून येत आहे.

ऑक्टोबर २०२५  पासून ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यादरम्यान अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी आल्या होत्या. ई-केवायसी करूनही नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे जमा न झाल्याने महिलांकडून रोष व्यक्त करण्यात आला. ई-केवायसी करताना अनेक महिलांनी फॉर्म चुकीचा भरला होता.

त्यामुळे असंख्य पात्र महिलाही अपात्र ठरल्या होत्या. त्यानंतर ही चूक दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय सतत तांत्रिक अडचणी येत असल्याने ई-केवायसीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

जानेवारीमध्ये राज्यातील २९ महानगपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. जानेवारीचा हप्ता प्रलंबित होता. फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप हा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता.

अखेर सोमवारपासून जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी पात्र महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता म्हणून १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न अद्यापही आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top