जगप्रसिद्ध रांजणखळगे हे पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण स्थान असून विकासासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज आहे. - पद्मश्री पवार

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी- सागर आतकर

राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा महिमा अगाध असून निघोज येथील मळगंगा देवस्थान व कर्जुलेहर्या येथील हरेश्वर देवस्थानचा विकास प्रगतीपथावर आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ अमृताराठ तसेच हरेश्वर देवस्थानचे सर्वेसर्वा व नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के व गावकऱ्यांनी केलेल्या विकासकामांच्या पाठपुराव्यामुळे गाव व परिसर तसेच देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. याचा आदर्श व अनुकरण अहिल्यानगर जिल्ह्यातील देवस्थान ट्रस्टने घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.

पवार व शिर्के यांनी नुकतीच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे दर्शन घेत ले. ट्रस्ट कार्यालयातील अभ्यासिका, वाचनालय आदींना भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा मातेचा महिमा अगाध असून जगप्रसिद्ध रांजणखळगे हे पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण स्थान असून विकासासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज आहे. -पद्मश्री पवार

   

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार तसेच नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के यांचा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या हस्ते ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, सचिव शांताराम कळसकर यांनी तीर्थक्षेत्र व जगप्रसिद्ध रांजणखळगे पर्यटन विकास संदर्भात माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी स्वागत केले.

 

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे वाचनालय व अभ्यासिका मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व गावकऱ्यांनी लोकसहभागातून हायटेक केली आहे. यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत रुजू होतील. प्रथम व द्वितीय श्रेणीचे अधिकारी म्हणून गावाचा नावलौकिक राज्यात होईल.- शिवाजीराव शिर्के, संपादक नगर सह्याद्री

 

पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, सामाजिक उपक्रम विभागाचे प्रमुख विनोद गोळे, मा. सरपंच ठकाराम लंके, पारनेर तालुका पैलवान प्रतिष्ठान पदाधिकारी अर्जुन लामखडे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, शंकर गुंड, विश्वस्त संतोषशेठ रसाळ, बबनराव ससाणे, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक भिवाशेठ रसाळ, ट्रस्टचे प्रसिध्दीप्रमुख मुकुंदराव निघोजकर, निघोज सोसायटीचे संचालक दिलीप कवाद, वसंत ढवण, व्यवस्थापक महेश ढवळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2


 

To Top