महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर- निघोज / प्रतिनिधी: सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात आई माझ्या महाविद्यालयात हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला. दिपप्रज्वलण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ग्रामीण भागात पूर्वी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय कमी असल्याने मुलींचे लवकर लग्न केली जात होती. त्यामुळे शिक्षणाची आवड असतानाही अनेक मुलींना लग्नामुळे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे साक्षरता कमी झाली. मात्र आता ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलींनी आधी शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे रहावे. आज शिक्षणाला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रतिकुल परीस्थितीला सामोरे जाताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जीवनातील उच्च घेय गाठा. असा सल्ला जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली शेळके यांनी दिला.
या कार्यक्रमात उपस्थित माता अन् विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत अतिशय भावनिक होत उपस्थित मातांनी आपल्या मुलींना पाठबळ दिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जीवनात उंच भरारी घ्या. आपल्या माता तुमच्या पाठीशी उभे राहतील. तसेच प्रत्येक मुलींनी आपल्या आईवडिलांची काठी व्हा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य मनिषा गाडीलकर, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष खणकर, श्रीकांत खोडदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य एस. के. आहेर यांनी महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रास्ताविक उपप्राचार्य मनिषा गाडीलकर यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. निलिमा घुले यांनी केले तर प्रा. दुर्गा रायकर यांनी आभार मानले.


.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद