आनंदी बाजारामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळते - अल्पेश ढवळे

0

 
आनंदी बाजारचा शुभारंभ करताना अल्पेश ढवळे

महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी- सागर आतकर 

          निघोज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आनंदी बाजारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक व्यावहारिक ज्ञान उपलब्ध करून देऊन एक चांगला सामान्य ज्ञानाला पोषक वातावरण निर्मिती करीत स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी कसे तयार होतील असे खात्रीशीर शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मिळत असल्याचे खरे समाधान पालकांना आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आपली मातृ आणि पितृ संस्था असल्याचे गौरवोद्गार युपीएससी परीक्षेत देशात ६८७ रॅंकने यशस्वी झालेले अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांनी व्यक्त केले आहे. निघोज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मंगळवार दि.१७ रोजी सकाळी न‌ऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आनंदी बाजारचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदी बाजारचे उद्घाटन ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार दत्ताजी उनवणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंद्र प्रमुख बाचकर सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास शिंदे, मुख्याध्यापक गणपतराव देठे, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, ज्येष्ठ शिक्षीका लंके मॅडम, शिक्षीका लाळगे मॅडम, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, वडनेर गावचे माजी सरपंच शिवाशेठ पवार, शिरुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, पसायदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र महाराज सुपेकर, युवा नेते राहुल पांढरकर, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, पत्रकार संघाचे पदाधिकारी आनंद भुकन, पत्रकार सागर आतकर, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, युवा नेते देवीदास पवार, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार, ग्रामपंचायत सदस्या भावना साळवे. अरुणाताई ढवळे, विठ्ठलराव ढवळे, नगर सह्याद्रीचे अधिकारी मंगेश थोरात, स्वरांजली केक्स या गृह‌ऊद्योगाच्या अध्यक्षा सरला उनवणे, रुपाली ससाणे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




ढवळे यावेळी म्हणाले, गेली वीस वर्षापूर्वीची शिक्षण पद्धती व आजची शिक्षणपद्धती यामध्ये आमूलाग्र बदल झाला असला तरी दिवसेंदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावत असून आपला याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक विकास झाला असून आपण जिल्हा परिषद शाळेला कधीच विसरणार नाही एवढे मोठे योगदान गुरुजनांनी आपल्या साठी दिले असून केंद्र प्रमुख बाचकर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देठे सर, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, ज्येष्ठ शिक्षिका लंके मॅडम,शिक्षीका लाळगे मॅडम यांनी या शाळेचा पट वाढवून या ठिकाणी खऱ्या अर्थाने शैक्षणिक संस्कृतीला पाठबळ दिले असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन ढवळे सर यांनी व्यक्त केले आहे. पसायदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र महाराज सुपेकर यावेळी म्हणाले अल्पेश ढवळे यांनी युपीएससी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन देशात नावलौकिक मिळवला आहे. ढवळे हे निघोज व परिसरातील पहिलेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावत आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या भविष्यात वाढणार आहे. कारण याठिकाणी सुद्धा मराठी आणी इंग्रजी शिक्षण चांगल्याप्रकारे मिळत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक देठे सर, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, ज्येष्ठ शिक्षिका लंके मॅडम, शिक्षीका लाळगे मॅडम यांनी आजपर्यंत चांगले काम केले आहे. लंके मॅडम यांनी तनपुरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काम करताना स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी जास्त संख्येने येण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.. चारही शिक्षकांचा नावलौकिक मोठा असून अल्पेश ढवळे यांच्या सारखे विद्यार्थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पुढे येऊन दिल्ली गाजवतात हा खरा या मराठी शाळांचा अभिमान असल्याचे सांगितले. 

 यावेळी केंद्र प्रमुख बाचकर सर, मुख्याध्यापक देठे सर, सुपेकर सर, उनवणे आदींची भाषने झाली.


सकाळी न‌ऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हा आनंदी बाजार सुरु होता. विशेष म्हणजे मंगळवार हा निघोजचा बाजारचा दिवस आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आवारात या आनंदी बाजारचे आयोजन केल्याने विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मिठाई, खेळणी, भाजीपाला, फळे यांची रेलचेल या बाजारात होती शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या आनंदी बाजारात सहभाग घेतला. चार तासात पन्नास हजार रुपयांची उलाढाल या ठिकाणी झाली. यामध्ये निघोज येथील प्रभाग क्रमांक चारमधील असंख्य महिलांनी सहभागी होऊन खरेदी करुण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या शाळेतील चार शिक्षकांनी तब्बल सहा हजार रुपयांची खरेदी करीत प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यवसाय कसा होईल व विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान होईल यासाठी मार्गदर्शन केले. पत्रकार संघातील प्रत्येक सदस्यांनी सोशल मिडिया माध्यमातून या आनंदी बाजारची प्रसिद्धी केल्याने शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ व महिला यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुण खरेदीचा आनंद घेतला. परिसरातील अनेक शाळांनी आनंदी बाजारचे आयोजन केले होते. मात्र सर्वाधिक प्रतिसाद आज दि.१७ रोजी झालेल्या आनंदी बाजारला मिळाला असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top