महामानवाला अभिवादन.....निघोजमध्ये १३५ वी जयंती उत्साहात साजरी

0

महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी- सागर आतकर 

            पारनेर तालुक्यातील निघोज येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी आमदार दाते सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा पाया हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून तो समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांवर चालणे म्हणजेच खऱ्या अर्थाने समाज घडविणे होय. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रत्येकाने समाज परिवर्तनात आपले योगदान दिले पाहिजे.”

कार्यक्रमास शंकरराव नगरे, सौ. सुधामती कवाद, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठलराव कवाद, डीवायएसपी सुभाषजी सोनवणे, पीएसआय दिलीपजी सोनवणे, पीएसआय दिनेशजी सोनवणे, पीएसआय प्रियंका शेटे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन हिराभाऊ सोनवणे, बी. एन. सोनवणे सर, रोहिदास लामखडे आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामानवाच्या विचारांनी प्रेरित होत समाजात समता, न्याय आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top