आरोपीने स्वतःवरच केले ब्लेडने वार

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर

            पारनेर -तालुक्यातील निघोज येथील एटीएम फोडल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका परप्रांतीय आरोपीने स्वतःवर धारदार वस्तूने वार करून घेतल्याचा प्रकार सोमवारी (दि. 13) सकाळी 11.15 च्या सुमारास घडला. संदीप भजन सिंग असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. 

दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील बसस्थानक परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम शनिवारी (ता. 21) रात्री ते पहाटे दरम्यान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता परंतु तो अपयशी ठरला होता.परंतु 4 दिवसांत तांत्रिक माहिती आधारे पारनेर पोलिसांनी या एटीएम फोडी प्रकरणी संदीप भजन सिंग (वय 22, मूळ रा. महालेवाला, जि. फिरोजपूर, राज्य पंजाब, हल्ली रा. निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी 23 मार्च रोजी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद संकेत वैद्य यांनी दिली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता तो न्यायालयीन कोठडीत असताना हा प्रकार घडला.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top