अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार…

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / अहिल्यानगर

            लग्न करून पैसे, सोने घेऊन वधू फरार झाली अशा घटना घडतात.मात्र अकोले तालुक्यात चक्क विवाहित मुलाने पहिला विवाह दडवून दुसऱ्या विवाहाची तयारी करत हाय प्रोफाईल फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आधीच लग्न झालेल्या आणि नंतर दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करणाऱ्यास अकोले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील मूळचे रहिवासी असलेले हासे कुटुंब सध्या रत्नागिरी (मंडणगड) येथे राहते.मुलाचे वडील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, आई शिक्षिका, मुलगा पुण्यात इंजिनिअर असल्याची माहिती शादी डॉट कॉमवर आली. त्यानंतर अकोले तालुक्यातील एका कुटुंबातील मुलीला हे

स्थळ शोधले गेले. लग्नाची बोलणी झाली. पाहुण्यांचे मुलीच्या घरी येणे- जाणे सुरू झाले.

हा हायप्रोफाईल फसवण्याचा प्रकार आहे आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे अजून किती लोकांना फसवले याचा शोध सुरू आहे लवकरच इतर आरोपी ताब्यात घेतले जातील - महेश बोरसे( पोलीस निरीक्षक)

कोतुळात एक हजार माणसांच्या उपस्थितीत साखरपुडाही झाला. सोन्याची चेन, अंगठी यासाठी ऑनलाइन पैसे नवऱ्यामुलाला दिले गेले. १० मे रोजी संगमनेर येथे लग्नाचा दिवसही ठरला. साखरपुडा, सोने, मंगल कार्यालय, आचारी इसार, कपडे यासाठी १४ लाख ८० हजार रुपये खर्च केला. मुलगा नवऱ्या मुलीशी संपर्क करत नाही, त्यामुळे शंका निर्माण झाली. खातरजमा केली असता सदर मुलाचे लग्न अगोदरच झाल्याचे कळाले. त्यानंतर मुलीच्या आईने अकोले पोलिसांत तक्रार दिली. अकोले पोलिसांनी मुलगा निखिल प्रकाश हासे यास ताब्यात घेतले आहे. तर प्रकाश दत्तात्रय हासे, अनिता प्रकाश
हासे, व इतर चार जण फरार आहेत.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top