कुंड पर्यटन क्षेत्रात शिवबा संघटनेची स्वच्छता मोहीम यशस्वी

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर 

        मळगंगा देवीची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यानंतर कुंड पर्यटन क्षेत्र येथे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवबा संघटना यांच्या वतीने आज स्वच्छता मोहिमेचे नियोजन करून ती यशस्वीपणे राबविण्यात आली.


शिवबा संघटनेच्या मावळ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कुंड परिसरातील प्लास्टिक, कचरा व घाण साफ केली. या मोहिमेमुळे पर्यटन स्थळ पुन्हा स्वच्छ व निसर्गरम्य झाले आहे. विशेष म्हणजे, शिवबा संघटना दरवर्षी यात्रेनंतर अशा स्वच्छता मोहिमा राबवत असून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण निर्माण करत आहे.


यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व मावळ्यांनी एकत्र येऊन कुंड परिसरात दरवर्षी होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार केला. लवकरच यासाठी ठोस नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.


स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनीही शिवबा संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशा सामाजिक कार्यातून स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचत असल्याचे मत व्यक्त केले.


"गाव तिथे शाखा, घर तिथे मावळा" या ब्रीदवाक्यानुसार शिवबा संघटना सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top