गणेश संभाजी धुमाळ यांना पीएच.डी. प्रदान

0


पुणे:

      पंढरपूर तालुक्यातील कौठळी गावचे सुपुत्र गणेश संभाजी धुमाळ यांना पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय ‘परफॉर्मन्स इन्वेस्टीगेशन ऑफ डबल पाइप हीट एक्सचेंजर युसिंग ट्विस्टेड टेप इन्सर्टस इन साईड अँड आऊट साईड पाईप सरफेसेस’असा होता. ह्याचा वापर कार्यक्षमता प्रीडिक्शन, बॉयलर, रिन्यूएबल एनर्जी सिस्टिम, वेस्ट हीट रिकव्हरी यामध्ये होऊ शकतो.


गणेश धुमाळ यांनी पीएच.डी. दरम्यान, उच्च मानांकित आंतरराष्ट्रीय एल्सेव्हियर जर्नल्समध्ये तीन शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. यासाठी त्यांना प्रा.डॉ.संजय एन.हावलदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


गणेश धुमाळ यांना त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी कुलगुरू डॉ. रविकुमार एम.चिटणीस यांनी विद्यापीठातर्फे सत्कार करुन अभिनंदन केले. तसेच अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड, डॉ.दिनेश शेठ, डॉ. शिवप्रकाश बर्वे, डॉ.मूर्ती चावली, डॉ.कृष्णा वऱ्हाडे यांचे सहकार्य लाभले. डॉ.गणेश धुमाळ हे मल्टिनॅशनल कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट पदावर काम करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top