निघोज प्रकरणातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी

0



पारनेर-

पारनेर तालुक्यातील निघोज येथील हॉटेल व्यवसायिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत सामुहिक बंद पाळण्यात आला. यावेळी हल्ला करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करत मोक्का लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान ग्रामस्थांनी सदर हल्ल्याचा निषेध करत गावात मुक मोर्चा काढत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले.


गुरुवारी (दि.४) रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. येत्या दोन दिवसांत पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यावेळी ठकाराम लंके, सचिन वराळ, रुपेश ढवण, खंडू भुकन, दत्ताजी उनवणे, बाबाजी वाघमारे, शशिकला भुकन, वसंत कवाद, नामदेवराव थोरात, अनिल शेटे, चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, बबुशा वरखडे, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, अंकुश लोखंडे, वसंत ढवण, बाळासाहेब रसाळ, योगेश वाव्हळ, महेश लोळगे, मयुर गुगळे, सोनीताई पवार, सुरेश खोसे पाटील, भास्करराव कवाद, आनंद भुकन, योगेश खाडे, जयसिंग हरेल, सागर आतकर, रवि रणसिंग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


या हल्ला प्रकरणी ९ जुलै रोजी होणार्‍या ग्रामसभेत मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे. पारनेर व नगर पोलिसांनी या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली. या गुन्ह्यांतील धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार असून याची माहिती पोलीसांना आहे, मात्र स्थानिक पोलीस अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याने राजरोसपणे हा गुन्हेगार निघोज, टाकळी हाजी ता.शिरुर परिसरात दहशत निर्माण करत आहे. हॉटेलवर हल्ला करुन त्याने ग्रामस्थांवर मोठी दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे यावेळी ग्रामस्थांनी निषेध सभा घेत सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी गावातून मुक मोर्चा काढला. मळगंगा मंदीरासमोर जाहीर निषेध सभा घेत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

निघोज परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत. यामध्ये मटका, जुगार, अवैध दारू हे दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र निघोज, पारनेर, नगर पोलीस खात्याला या धंद्याची परिपूर्ण माहिती असूनही ते डोळेझाक करतात. हप्ता दे धंदा कर ही त्यांची पद्धत समाजातील गुन्हेगारीला उत्तेजन देणारी आहे. अवैध धंदे बंद न झाल्यास याचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहोत. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top