पारनेर पोलिसांनी नगरच्या पोलिस मुख्यालयातुनच आवळल्या वाळू तस्कराच्या मुसक्या

1 minute read
0






पारनेर( प्रतिनिधी)-
वाळु तस्करी रोखण्यासाठी गेलेले पारनेर तहसीलदार प्रविण चव्हाणके यांच्यावर वाळूचा डंपर घालणार व अधिकारी कर्मचारी यांचाशी कारवाई करताना हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा करणाऱ्या वाळू तस्कर बापू बन्सि सोनवणे याला पारनेर पोलिसांनी नगरच्या पोलिस मुख्यालयातुनच ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार असलेला हा आरोपी पोलिस मुख्यालयात पोहचला कसा व कशासाठी याबाबत पोलिस वर्तुळातच उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान पारनेर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी,नगरहुन पारनेरकडे येत असताना भाळवणी परीसरात पारनेरचे तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्यावर वाळुचा डंपर घालण्याचा व अधिकारी कर्मचारी यांच्याशी कारवाई करताना हुज्जत घालण्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. त्यानुसार डंपर चालक पिण्या रा.भिल्ल हट्टी वस्ती जखणगाव व वाळू तस्कर बापू बन्सि सोनवणे रा. हिगंणगाव ता. नगर या दोघा विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासुन हे आरोपी फरार होता. पारनेर पोलिसांचे एक पथक या आरोपीच्या मागावर असताना बापु बन्शी सोनवणे हा आरोपी नगरच्या पोलिस मुख्यालयात आल्याची खबर पारनेर पोलिसांना मिळली.त्यांनी या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.तहसिलदार फिर्यादी असलेल्या या गुन्ह्यातील आरोपी एका पोलिस निरिक्षक यांच्या निवासस्थानात हा आरोपी असल्याची खबर पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना समजताच या आरोपीचा माग घेण्यासाठी पारनेर पोलिसांच्या पथकाने या पोलिस निरीक्षकाच्या निवासस्थानाबाहेर सापळा लावला.या निवासस्थानातुन आरोपी बाहेर येताच पारनेर पोलिसांनी अटक केली.दरम्यान हा आरोपी नेमका पोलिस मुख्यालयात कशासाठी आला होता व त्या पोलिस निरिक्षकाच्या निवासस्थानात नेमकी काय चर्चा सुरु होती याची जिल्हा पोलिस अधीक्षक चौकशी करणार का याबाबत ऊत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2

To Top