आजारपणाला कंटाळुन पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवुन आत्महत्या

0
निघोज(प्रतिनिधी )
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.आज सकाळी ही घटना उघडकीस आली .पोलिस प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असुन या दुर्देवी घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.




याबाबत माहीती अशी की,पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील तरुण शेतकरी बाबाजी विठ्ठल बढे ( वय ३७) पत्नी कविता बाबाजी बढे(वय-३३), मुलगा आदित्य बाबाजी बढे( वय-१५), व धनंजय बाबाजी बढे( वय-१२) हे चार जण घरात एकत्र राहत होते. पत्नी कविता ही नेहमी आजारी असते तर एक मुलगा आदित्य हा अपंग होता. पत्नीचे आजारपण व मुलाच्या अपंगत्वामुळे ह्या कुटुंबात नैराश्य पसरले होते. त्यातच पत्नीच्या आजारपणाचा या कुटुंबाने धसका घेतला होता. या आजारपणाला कंटाळुन सोमवारी पहाटे बाबाजी बढे याने पत्नी कविता व दोन मुले धनंजय व आदित्य यांंच्यासह राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली.आज सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा अपंग होता. मात्र धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. तो सातवीत शिकत होता. यांनी कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली याविषयी गावकरी अनभिज्ञ आहेत. मात्र या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top