सातारा जिल्ह्यात एक रुग्ण वाढला...

0
सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील निकट सहवासित 26 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 99, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच गुरुवारी (ता.14) रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आठ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 78, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 45, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top