पारनेर (प्रतिनिधी : चंद्रकांत कदम): पारनेर तालुक्यातील निघोज चा रहिवासी व पिंपरी जलसेन गावचा 39 वर्षीय जावयाचा मृत्यू कोरोणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून त्यांना तपासणीसाठी अहमदनगर येथे नेण्यात येत आहे.
हा मृत तरुण मुंबईतील घाटकोपर मधून आला असून घाटकोपर मधून तरकारी च्या गाडीने येत असताना माळशेज घाटातील मढ येथे चेकनाक्यावर गाडी पकडल्यानंतर त्या युवकासह त्याच्या पत्नीला व मुलांना तिथे उतरून देण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी जलसेन येथील दोन तरुणांनी दुचाकीवरून वेल्हे येथून त्या पती पत्नी स मुलांना पिंपरी येथे घेऊन आले. पोलिसांनी या कुटुंबाला माळशेज घाटातील येथे चेक पोस्टवर उतरवल्यानंतर ते बेल्हे पर्यंत कसे आले हा त्यांचा प्रवास संभ्रमात टाकणारा आहे. या प्रवासादरम्यान कोण कोण त्यांच्या संपर्कात आले यांचीदेखील कोरुना तपासणी करणे गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर असे की, मुंबईतील घाटकोपर येथून हा युवक आपल्या पत्नी व दोन मुलांसह ३ मे रोजी पहाटे तरकारी वाहतूक करणाऱ्या ओळखीच्या गाडीने गावाकडे निघाला. गाडी माळशेज मार्गे येत असताना माळशेज घाटातील मढ येथील चेक पोस्टवर सदर गाडी थांबून चेक करण्यात आले त्यावेळी या गाडीमध्ये प्रवासी असल्याने या प्रवाशांना तेथेच उतरून घेण्यात आले व सदर ड्रायव्हरला समज देण्यात आली. त्यानंतर तो ड्रायव्हर ती गाडी घेऊन पारनेर कडे रवाना झाला. परंतु त्या कुटुंबाला तेथेच उतरून घेण्यात आले. सकाळी त्यांना तिथे उतरून घेण्यात आल्यानंतर दिवसभर चेकपोस्टवर बसून ठेवण्यात आले. व सायंकाळी ते कुटुंब बेल्हे येथे रवाना झाल्यानंतर पिंपरि जलसेन येथील त्या कुटुंबाचे नातेवाईक असणारे दोन युवकांनी दुचाकीवरून त्यांना पिंपरी येथे आणले.
12 मे रोजी या तरुणाला श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घासाचे स्त्राव तपासणी नमुने घेण्यात आले. मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कसून चौकशी करून त्यांना तपासणीसाठी नगर येथे नेण्यात आले. परंतु हे कुटुंब मढ येथील चेक पोस्टवर उतरल्यानंतर ते बेल्हे पर्यंत कसे पोहोचले ? त्यांना बेल्हे पर्यंत कुणी सोडले ? मढ ते बेल्हे हा प्रवास करत असताना हे कुटुंब व कोरणा ग्रस्त तरुण कुणा कुणाच्या संपर्कामध्ये आला ही माहिती अद्याप पर्यंत संभ्रमात आहे. या कुटुंबाने मढ ते बेल्हे पर्यंतचा प्रवास कसा केला या प्रवासा दरम्यान त्यांच्या संपर्क मध्ये कोण कोण आले याचा शोध घेऊन संपर्कात आलेल्या सदर व्यक्तींची तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे.यापूर्वी प्रशासनाच्या वतीने त्या मृत तरुनाच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबीय, बेल्हे येथे या कुटुंबाला आनण्यासाठी केलेले दोन तरुण, मृत तरुणीचे आई-वडील संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी मृत तरुणाच्या पत्नीसह 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित एका अहवालाची प्रतीक्षा आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद