अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - अनिल शेटे

0
पारनेर,दि.१७ : तालुक्यात अवकाळी पाउस होत आहे. पुढे हि होण्याची दाट शक्यता आहे. अधिच लॉकडाउनमुळे पिचलेला शेतकरी आर्थिक बाबतीत खचून गेला आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही. अन बाजारपेठ उपलब्ध होत नाही. अवकाळी पावसाने शेतीमाल, फळभागा विविध शेतीमालाचे नुकसान होत आहे. अन नुकसानीमुळे शेतकरी मोडून पडल्याशिवाय राहणार नाहि. म्हणून प्रशासकीय यंत्रणा जरी कोरेना मध्ये अडकली असली तरी हि शेतकरी प्रश्न मोठा आहे.

     सबंध देश बंद असताना काबाडकष्ट करून देशाच पोट भरण्याच काम शेतकरी बाप करत आहे. म्हणूनच प्रशासनाने शेतकर्यांच्या या नुकसानीचे पंचनामे करावे. व यापुढे हि अवकाळी पाऊस पडून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपली यंत्रणा सज्ज असण्याची गरज आहे. पंचनामे करून घेण्यासाठी शेतकर्यांना मनस्ताप न देता तातडीने पंचनामे करावे. पंचनामा करण्याबाबत अडचण आल्यास अनिल शेटे यानी ९८५०२६०४२४ नंबरवर संपर्क करण्याचे अहवान केले.

यासंदर्भात निवेदन शेतकरी नेते राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु,जिल्हाअधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी, पारनेर तहसीलदार देवरे मॅडम, तालुका कृषी अधिकारी दरेकर यांना देण्यात आले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top