औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील थांबलेला यंत्रांचा खडखडाट होणार.. कुठे होणार सुरू वाचा सविस्तर

0
पिंपरी चिंचवड : गेल्या 52 दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील थांबलेला यंत्रांचा खडखडाट सुरू होणार आहे. कारण शहरातील कंटेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी (ता. 14) परवानगी दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या बाबतचा आदेश काढला. मात्र, कपंन्यांना 33 टक्के कामगारांच्या सहाय्यानेच कामकाज करावे लागणार आहे. 
लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून हे उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक उद्योग अडचणीत आले होते. लॉकडाउन वाढल्याने निराश झालेले अनेक कंत्राटी कामगार गावाकडे निघून गेले. त्यामुळे कंपनी सुरू करताना उपलब्ध मनुष्यबळातच मालकवर्गाला कामकाज करावे लागणार आहे. शहरातील उद्योजकांच्या संघटनांनी कंपन्या सुरू करण्याची मागणी सरकारकडे सातत्याने लावून धरली होती. कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी शहरातील कामगार असायला हवेत. कंपनीची बस अथवा चारचाकी वाहनातूनच कामगारांनी प्रवास करायचा आहे. 

कंटेन्मेंट झोन वगळूनच परवानगी 
यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले, "कंटेन्मेंट झोन वगळून शहरातील उद्योग करण्यास परवानगी दिली आहे. त्याच्या काही अटी-शर्ती आहेत. या बाबतचे आदेश शुक्रवारी (ता. 15) काढण्यात येतील. दुचाकीवरून कोणीही ये-जा करू शकणार नाही.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या सुट्या पार्टसाठी पिंपरी-चिंचवडवर अवलंबून आहेत. त्यांना सुटे भाग मिळत नसल्यामुळे या कंपन्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. - दीपक फल्ले, अध्यक्ष - लघुउद्योग भारती (उद्योजकांची संघटना)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top