निघोज येथील वर्ग मित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी

0
पारनेर दि.१२ - तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी विद्यालयाच्या १९९१ च्या दहावीच्या बॅचच्या "आठवणीतले शाळेचे दिवस" या ग्रुपच्या वतीने कोरोना संकटात मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस बावीस हजार रुपये रक्कम देऊन मदतनिधी जमा करण्यात आला आहे. 
सध्या कोरोना संकटाने राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे तसेच  कोरोना प्रतिबंधासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणात निधीही खर्च होत आहे. या परिस्थितीत शासन विविध उपाययोजना राबवत असताना या उपाययोजनांना लागणाऱ्या निधीस आपलाही थोडाफार खारीचा वाटा असावा या उद्देशाने या ग्रुपमधील सदस्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देण्याचे ठरवून यथाशक्ती मदतनिधी संकलन करून स्टेट बँकेचे निघोज शाखाधिकारी यांच्याकडे सदर मदतनिधीचा चेक देऊन मुख्यमंत्री सहायता फंडात मदतनिधी जमा केला आहे. न्यायाधीश मनिषा थोरात, सुवर्णा मुळे, अरुणाताई देठे, शुभांगी लामखडे, सुनिता पवार पारनेर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट सुनील मेसे, निघोज गावचे उपसरपंच बाबाजी लंके, पारनेर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष कारभारी बाबर, शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय लंके, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश गुंड,  संजय बेलोटे, गणेश सुपेकर, निलेश सोनवणे, रमेश सुपेकर, भिकाभाऊ वरखडे, दादाभाऊ बेलोटे, चंद्रशेखर काजळे, दिलीप कवाद, भाऊसाहेब लंके, संतोष लंके,  देविदास भाकरे, नामदेव रसाळ, ज्ञानदेव ढवळे, सतिश काजळे,  राजू साळवे, नंदराम तडके, सुभाष तडके,  साहेबराव तांबे यांनी एकत्रित मदतनिधी जमा केला आहे.

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र ही होरपळून निघतोय. यामुळे या परिस्थित शासन विविध उपाययोजना राबवत आहे. यासाठी आपलाही थोडा हातभार म्हणून आमच्या "आठवणीतले शाळेचे दिवस" या ग्रुपने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने यथाशक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी - बाबाजी लंके (उपसरपंच निघोज)

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top