प्रतिपंढरपूर पळशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी शांततेत

0

पारनेर:-  तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे पळशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असणारे व अतिशय सुक्ष्म नक्षीकाम असणारे एक प्राचीन मंदिर आहे.  हे मंदिर आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी अतिशय सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मूर्तीची पूजा व महाआरती नित्यनियमाने करण्यात आली. त्यामुळे यावर्षीची कार्तिकी एकादशी साध्या पद्धतीने संपन्न झाली. मंदिराच्या चारही बाजूस भव्य अशी तटबंदी व कोरीव नक्षीकाम असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देण्यास येत असतात. मात्र त्यांनीही यावर्षी कोरोनामुळे पाठ फिरवली आहे.


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top