जवळा येथील ठाकरवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

जवळा: सावित्री बाई फुले यांची जयंती हि बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. यानिमित्ताने मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे याची विविध स्तरावर जनजागृती केली जाते.  आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती! सावित्रीबाईची ओळख महाराष्ट्राला समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची पत्नी अशी असली तरीही त्या कवियित्री, समाजसुधारक आणि भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रात सातारा येथील नायगाव मध्ये झाला. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू केली. केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांना देखील छेद देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील जवळा येथील ठाकरवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. मी तन,मन,धनाने या समाजातील लोकांना तसेच समाजातील मुलां-मुलींना शिक्षित करण्याचा माझा निर्धार करत आहे, असे क्रांतीज्योती महिला ग्रामसंघच्या अध्यक्षा सोनाली संदिप सालके यांनी सांगितले.या कार्यक्रमप्रसंगी माजी ग्रा.सदस्या अनुराधा गवळी, मनीषा कानिफनाथ पठारे, जया इंगळे, छाया सालके, परवीन मणियार,कांताबाई जाधव,संगीता काळे, दीपाली गवळी, रुपाली गवळी, रेश्मा गवळी,संगीता रमेश काळे, कविता संजय जाधव, मीराबाई काळे, उज्वला संजय देशमुख, कमल जाधव, सगुणा जाधव, आशा अनिल जाधव, नीता देशमुख, संगीता जाधव, मीना देशमुख, झुंबर केदारे, दिक्षा पठारे आदी महिला उपस्थित होत्या.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top