राज्य मराठी पत्रकारसंघाचे वतीने पारनेरमधील पत्रकारांना हेल्मेट, डायरी, कॅलेंडर व मास्कचे मोफत वाटप..

0
पारनेर: येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील पत्रकारांना स्वरक्षणासाठी मोफत हेल्मेट, मास्क व डायरीचे याचे न्यु आर्ट्स, काॅमर्स, सायन्स काॅलेजच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहामधे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे शुभहस्ते व राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटेसर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वृक्षाला मान्यवरांचे हस्ते पाणी घालत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तहसिलदार ज्योती देवरे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,प्राचार्य डाॅ.रंगनाथ आहेरसर,कार्यक्रमाचे निमंत्रक व पारनेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता गाडगेसर आदींनी विचार व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी दोन वर्ष केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणुन,प्रदेश व जिल्ह्याच्या संघटनेने दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा सचिवपदी पत्र देवुन नियुक्ती करण्यात आली. तसेच,राळेगणसिध्दी येथील पत्रकार एकनाथ भालेकर यांची पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

याप्रसंगी संघटनेचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख भाऊसाहेब वाघचौरे, कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, पत्रकार सदानंद सोनावळे, रामदास नरड, बाबाजी वाघमारे, ज्ञानेश्वर लोंढे, अविनाश भामरे, संतोष सोबले, शिरीष शेलार, गंगाधर धावडे, एकनाथ भालेकर, आनंदा भूकन, ज्ञानेश्वर लोंढे, सुधिर पठारे, संदिप  गाडे, विजय रासकर, सागर आतकर, राम तांबे, संजय मोरे, निलेश जाधव, भगवान श्रीमंदीलकर, चंद्रकांत कदम, किरण थोरात, अभिजीत कपाळे, निलेश शेंडगे, संपत कपाळे, पोपट पायमोडे, संपत वैरागर आदींसह पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी कोरोनाकाळामधे दिवंगत पत्रकारांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केले तर आभार संजय मोरे यांनी मानले.
राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्या देत या कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपताना स्वतहाची काळजी घ्या व मास्क व हेल्मेटचा वापर करा. पोलिस व प्रशासन यांच्या समवेत सर्व पत्रकार मित्रांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केले आहे. त्यांचा सन्मान होणे खरच गरजेचे आहे. आणि या सन्मान सोहळ्याला मला निमंत्रित केले त्यामुळे मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांचे आभार मानतो. -  सुधाकर भोसले(प्रांत अधिकारी)
येणार्‍या काळात पोलिस प्रशासन व पत्रकार हे एकत्र एकजुटीने काम करतील.- घनश्याम बळप (पोलिस निरीक्षक)












Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top