पारनेर: तालुक्यातील निघोज येथे लोकमतचे संपादक स्वांतञ्यसेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमित्ताने "लोकमत रक्ताच नात" या मोहिमे अंतर्गत लोकमत व कन्हैया दूध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कन्हैय्या उदयोग समुह दरवर्षी मोठा किर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करत असते.परंतु कोरोनामुळे दोन वर्ष हा खंड पडला आहे. कोरोना काळात कोणताही सामाजिक उपक्रम असु दया आम्ही उस्फूर्त सहभाग घेवुन आमची समाजाप्रती बांधिलकी जपत आलोय. लोकमतचा लोकमत रक्ताच नात हा उपक्रम कोरोनाकाळात भारतासह जगालाही दिशादर्शक ठरणार आहे. कारण कोरोनाकाळात रक्तदातेही रक्तदान करण्यास घाबरत आहे. लोकमतच्या उपक्रमामुळे रक्तदात्यांमध्ये आत्मविश्वास येत आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत.- मच्छिंद्र लंके (चेअरमन कन्हैय्या डेअरी फार्मचे)
शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपल्या अपार कष्टाच्या जोरावर पारनेर तालुक्याचे उदयोग क्षेत्रातील नाव कन्हैय्या उदयोग समुहाच्या माध्यमातुन देश विदेशात पोहचविले आहे.संपूर्ण देशात आम्ही हे शिबीर राबवत आहोत आणि कोरोनाच्या या महामारीला तोंड देण्यासाठी लोकमतचा हा छोटासा प्रयत्न निघोज येथे आम्ही केला आहे. मच्छिंद्र लंके व त्यांच्या कन्हैया उद्योग समुहास खूप खूप शुभेच्या- लोकमतचे जनरल मॕनेजर नरेंद्र अंकुश ,शरद मेहरकर
रक्तदान शिबीर उदघाटनप्रसंगी जी.एस.महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद,आत्मा कमिटीचे अध्यक्ष अॕड.राहुल झावरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके, महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाचे सदस्य सोमनाथ वरखडे, निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद, राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेश सरडे, निलेश लंके प्रतिष्ठानचे मिडियाप्रमुख संदिप चौधरी, पञकार दत्ताजी उनवणे, संजय बाराहाते, उदयराव शेरकर, जवळ्याचे सरपंच अनिता आढाव, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, राजेंद्र तारडे, शिवाजीराव लंके, विकास सावंत, नितीन अडसुळ, सुभाष आढाव, सचिन वराळ, शंकर लामखडे, राजेंद्र लाळगे, मंगेश वराळ, गणेश कवाद, दिगंबर लाळगे, विश्वास शेटे, रोहिदास लामखडे, ह.भ.प.श्रीहरी महाराज पवार, अरुण लंके, मंगेश लंके, अशोक ढवळे, अक्षय कवाद आदी मान्यवरांच्या हस्ते रक्तदानाचे उदघाटन झाले व आपण कन्हैय्या उदयोग समुहाचा एक घटक या भावनेतुन रक्तदानही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समुहाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मोठे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद तर सर्वांचे आभार उदयोजक सुरेश पठारे यांनी मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद