पारनेर : तालुक्यातील अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता राळेगण - गव्हाणवाडी हा नॅशनल हायवेवर अनेक मोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावर रोज छोटेमोठे अपघात घडतच होते. सबंधित अधिकाऱ्यांना पारनेर परीवर्तन व शिवबा संघटनेच्यावतीने मागणी करूनही दुर्लक्ष करत होते. शेवटी शिवबा संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला व त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. अन खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले. त्याबद्दल शिवबा संघटना व परीवर्तनचे ग्रामस्थानी आभार मानले.
संघटनेने घेतलेल्या आंदोलनाच्या भुमिकेला अनेक गावातून समर्थन मिळत होते. त्यामध्ये प्रामुख्याने परीवर्तन टीम गुणोरे, प्रितेश पानमंद, अल्पसंख्याक अध्यक्ष नवशाद पठाण, शेतकरी अध्यक्ष जयराम सरडे, विदयार्थी प्रमुख मच्छिंद्रनाथ लाळगे, एकनाथ मेसे, वैभव गाडिलकर, युवराज कारखिले, विशाल कारखिले, नवनाथ बरशिले, यश राहाणे, शुभम पाडाळे, नागेश नरसाळे, शुभम धायरे, लहु गागरे, एकनाथ शेटे, राजुभाउ लाळगे, शैलेश ढ्वळे, रोहित मोरे, अंकुश वरखडे, शंकर वरखडे, निलेश वरखडे, रोहन वरखडे, शांताराम पाडळे, अनिल गागरे, ठकाराम खोडदे, विकास मोरे, सोनु मदगे, पांडुरंग कारखिले, बाजीराव कारखिले, किरण कारखिले, दत्ता टोणगे, सचिन कोतकर, राहुल कर्डिले, दादाभाऊ रसाळ, गणेश चौधरी आदी सहकार्यानी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांचेही अनिल शेटे यांनी आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद