ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे अपहरण झालेला मुलगा तात्काळ शोधण्यात पारनेर पोलिसांना यश

0

पारनेर: ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे अपहरण झालेला मुलगा तात्काळ शोधण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले.

सविस्तर वृत्त- मंगळवार दिनांक 06 जुलै 2021 रोजी पारनेर पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या गावातून संध्याकाळी 9:22 वाजता कु.आकाश काळे राहणार - पिंपरी जलसेन वय - 24 याचे 3 अज्ञात लोकांनी पिंपरी जलसेन येथून MH 16 AJ 751 पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून अपहरण केले आहे हे कळताच, पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बळप यांच्या आदेशानुसार पारनेर पोलिस स्टेशनचे API प्रमोद वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल सुरज कदम यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600)नंबर वरून ही माहिती पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांना कळवली की, कु.आकाश काळे याचे अपहरण झालेले असून आरोपीं शोधण्यास मदतीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले,अपहरण झाल्याची माहिती आसपासच्या परिसरात पसरल्याने आरोपींनी कु.आकाश काळे याला वडझिरे येथे सोडून पुणेवाडी गावाच्या दिशेने पळ काढला त्यावेळी पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बळप,API श्री प्रमोद वाघ,PC श्री सुरज कदम,PC श्री मोकाते,PC श्री दिवटे,PC श्री सत्यम शिंदे,PC श्री यादव,PC श्री भापसे,PC श्री आदाट या सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांनी आरोपींचा पाठलाग केला असता पुणेवाडी गावा जवळ इनोव्हा गाडी सोडून आरोपीं अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे अपहरण झालेला मुलगा सुरक्षित रित्या मिळवण्यात पारनेर पोलिस स्टेशनला यश आले.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top