नागरिकांनी कोरोनाचे नियम मोडू नयेत- ज्योती देवरे (तहसीलदार पारनेर)

0

पारनेर: दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पिंपरी जलसेन व परिसर तहसीलदार ज्योती देवरे यांनी कंटेंटमेंट झोन घोषित केला असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी पिंपरी जलसेनमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

एकीकडे राज्यात रुग्णसंख्या कमी होत असताना पारनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर तालुका आहे ही चिंतेची बाब असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः याबाबत लक्ष घातले असून पारनेर तालुक्यात जनुकीय संक्रमन निश्चित (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी पिंपरी जलसेन येथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पिंपरी जलसेनमध्ये एवढे रुग्ण अचानक वाढणे ही चिंतेची बाब असून नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे. गावाबाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश नाकारायला पाहिजे. कंटेंटमेंट झोन कडक करून रुग्णसंख्या कमी होईपर्यंत गावात प्रत्येकाची चाचणी करून संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी भर देण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, अतुल भांबरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या वतीने गावात घरोघरी जाऊन रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर चचण्या करण्यात आल्या. आज दिवसभर करण्यात आलेल्या सुमारे ६५० नागरिकांच्या चाचण्यांमध्ये पिंपरी जलसेन मध्ये १७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घरीच राहून सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा वापर करण्याचे व बाहेरील लोकांना गावात प्रवेश देताना त्यांना विलगिकरणात ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. नागरिकांनी कोरोनाचे नियम मोडू नयेत यासाठी गावामध्ये पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top