जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली

0

निघोज । महाराष्ट्र दर्शन न्युज - 

जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या माध्यमातून आळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात विकासकामांचे भूमिपूजन सरपंच डॉ. कोमल भंडारी, उपसरपंच धनंजय घोलप, माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजी भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.





जिल्हा परिषद माध्यमातून गेली पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जिल्हा परिषद गटात शाळा, सामाजिक सभागृह, जलसिंचन योजना, आरोग्य, रस्ते, विज आदी विकासकामांवर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने विकासकामे मार्गी लागली आहेत.-  सचिन पाटील वराळ

यावेळी सखाराम उजागरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धोत्रे, चिमाजी भंडारी, किरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्या लता घोलप, मीराबाई शिरोळे, सारिका शिरोळे, श्वेता शिरोळे, ग्रामविकास अधिकारी बी. एम. दावबट, सीताराम जाधव, सखाराम चिमाजी उजगरे, शशिकांत कनिंगध्वज, अशोक शिरोळे, संजय मते, निखिल शिरोळे, निजाम मोमीन, नितीन परंडवाल, वैभव पावडे, सागर वाघ, आशा कार्ले, आशा आदक, आशा पंडित, आशा मोरे, अस्लम इनामदार, आकाश वराळ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top