निघोज/ महाराष्ट्र दर्शन न्यूज:
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे निघोज येथील श्री मुलीकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीरराचे उद्घाटन मौजे.पठारवाडी येथे झाडाला पाणी घालून करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात मा. राहुल झावरे पाटील बोलत होते. प्रमुख उपस्थितीत पठारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.उर्मिला सुपेकर मॅडम, उपसरपंच मारुती पठारे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन मा. सुखदेव पठारे, व्हा. चेअरमन मा. संतोष सुपेकर, मुलीकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एकनाथ पठारे सर, मा. भास्कर सुपेकर, मा. कुंडलिक पठारे, मा. नामदेव पठारे, मा. मोहन सुपेकर,मा. रमेश वाढवणे, सौ. सीताबाई सुपेकर
पठारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीर
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपटराव सुंबरे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद देशमुख, सदस्य प्रा. राम खोडदे, प्रा. केशर झावरे, प्रा. सोनाली काळे, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी राहुल झावरे म्हणाले की श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळतो. तसेच त्यांच्या नैतिक मूल्यांचा विकास होतो युवकांचे राष्ट्र निर्मितीत महत्त्वाचे योगदान असून श्रमदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले काम आनंद देणारे असते.श्रम संस्कार शिबिरे काळाची गरज असून अशा शिबिरातून समाज प्रबोधन करणारे व समाज उपयोगी नवीन उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवले पाहिजे. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता माध्यमातुन काम केले त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करावे असे सांगितले.
सरपंच सौ.उर्मिला सुपेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबवलेले उपक्रम व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले श्रम हे गावासाठी महत्त्वाचे ठरतील असे सांगितले. प्राचार्य डॉ.सहदेव आहेर म्हणाले की, शिबिरात सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांच्या हातून देशाची व समाजाची सेवा घडून येईल व समर्थ व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे सांगितले.
या शिबिरातून ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जाणीवजागृती, मातीपाणी संवर्धनासाठी चर खोदणे, रस्ता सुरक्षा अभियान, सामाजिक सर्वेक्षण, महिला जाणीव जागृती, कोरोना जागृती, आदी उपक्रम ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. वैशाली फ़ंड यांनी स्वागत गीत व रासेयो गीत सादर केले.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपटराव सुंबरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. आनंद पाटेकर यांनी केले.तर आभार सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद देशमुख यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद