आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने अक्षर मंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली यांच्या तर्फे डॉ. छाया साखरे यांना नारी शक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित केले तसेच ऑथर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या तर्फे ऑर्थरश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. डॉ. छाया साखरे यांचं ‘मीरा और मै’ या नावाच प्रथम पुस्तक लवकरच सर्वांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध होईल तसेच डॉ. छाया साखरे यांनी एका तासामध्ये ६२ भजने गाऊन ओ. एम.जी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये त्यांचे नामांकन झाले आहे.डॉ. छाया साखरे यांनी डॉ. दिनेश गुप्ता, डॉ. योगेश जोशी, जयंत भावजी, हेमंत नेहते, मंगेश घाटे आणि वैभव धनावडे याचे खूप खूप आभार मानले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी जेष्ठ लेखक आणि गीतकार सन्माननीय प्रवीण दवनेजी तसेच जेष्ठ लेखन आणि कवी सन्माननीय राजन लाखेजी उपस्थित होते. डॉ. छाया साखरेजीच कौतुक करताना प्रवीण दवनेजी म्हणाले ,“आशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या कलाकाराला कोणतीही किंमत मोजून भेटण्यासाठी उत्सुक राहीन.” यापूर्वी डॉ छाया साखरे यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांपैकी लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड, इंडियन स्टार अवॉर्ड, मुंबई महापौर पुरस्कार, इंटरनॅशनल टॅलेंट ऑर्गनायझेशन तर्फे अमेझिंग इंडियन पेर्सोनॅलिटी अवॉर्ड, फिल्ममोरा मीडिया नेटवर्क तर्फे के. सी.एफ फाऊंडेशन तर्फे दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड, राडॅसिड फिल्म्स ऑर्गनायझेशन तर्फे ग्लोबल इंडीयन डिवाईन इंडियन स्टार अवॉर्ड २०२१, एस. के. स्टार प्रोडक्षण तर्फे मिस्टर/मिस/मिसेस युनिव्हर्स queen अँड किंग २०२१ फॅशन शो ओपनर २०२१, राष्ट्ररत्न अवॉर्ड, गिरनार संगीत रत्न अवॉर्ड गुजरात, झी टाऊन सोसायटी अवॉर्ड आणि नॅशनल आचिव्हर्स तर्फे एम्पॉंवरिंग विमेन्स ऑफ इंडीया अवॉर्ड, महात्मा गांधी अवॉर्ड, नॅशनल ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशन दिल्ली याच्या तर्फे इंडियन आयकॉन अवॉर्ड, कला साधना संस्था वाशी यांच्या तर्फे जीवन गौरव पुरस्कार, इंटरनॅशनल टॅलेंट आनंदश्री ऑर्गनायझेशन तर्फे आय.टी.गोल्डन ग्लोब अवॉर्ड, त्रीनेत्र फिल्म्स आणि शक्ती फिल्म्स यांच्या तर्फे युथ आयकॉन अवॉर्ड, एम. एम. टी. फॅशन इंडिया अवॉर्ड, चंद्रकला चॅरिटेबल ट्रस्ट जयपूर यांचा तर्फे राष्ट्ररत्न आवर्ड २०२१, इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी यांचा तर्फे इंटरनॅशनल रीसर्चेर आवर्ड २०२१, युवा भाग्य फूड्स प्रोड्युसर वर्धा यांच्या तर्फे विदर्भ रत्न अवॉर्ड २०२१, नॅशनल ह्यूमन वेल्फेअर कौन्सिल तर्फे युथ आयकॉन अवॉर्ड , पीस ऑफ इंडिया परिवार तर्फे पीस ऑफ इंडिया परिवार अवॉर्ड २०२१, निर्वाण फौंडेशन नाशिक तर्फे इंटरनॅशनल आयडल आवर्ड, आय.आय. यु कॉन्व्हेंकेशन इंटरनॅशनल रीसर्चेर अवॉर्ड २०२१, के. सी. एफ फौंडेशन मुंबई तर्फे नारी शक्ती पुरस्कार आणि मिस दिल्ली ब्रॅण्ड अँबेसेडर घोषित तसेच ओ. एम. जी रेकॉर्ड, स्टार रेकॉर्ड बुक इंटरनॅशनल, नेशन प्राईड बुक रेकॉर्डस मध्ये नामांकन मिळाले आहे. आणि आय.आय. यु इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी द्वारे ऑनरररी डॉक्टरेट डिग्री प्राप्त झाली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद