आता तुमचं रेशन कार्ड होऊ शकतं रद्द, कारण काय? वाचा..

0



मागील अनेक वर्षांपासून ज्या रेशन कार्डधारकांनी (Ration card) धान्य घेतलेले नाही. तसेच त्यांनी कुठेही नोंद अपडेट होत नाही, अशा खातेधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. देशभरात बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण तुम्हाला माहितेय का? महाराष्ट्रात असेही काही लोक आहेत की जे स्वतःकडे रेशन कार्ड असले तरी धान्य घेत नाहीत वा त्याचा वापर करत नाहीत.

..मग रेशन कार्ड होणार रद्द

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील अनेक कुटुंब स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य घेत असतात. रेशन कार्डचा सरकारकडून विविध योजनांमार्फत लाभ घेणारे राज्यात लाखो कुटुंब आहेत. पण काही नागरिक स्वस्त धान्याचा लाभ गेल्या अनेक वर्षांपासून घेत नाही. म्हणून जे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानातून गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य घेत नाहीत अशा नागरिकांचं रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे, असा निर्णय अहमदनगर पुरवठा विभागाने घेतला असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाभाथी त्यांचे रेशन कार्ड सक्रिय ठेवत नाही, म्हणजेच ना कार्डवरून धान्य घेतात ना कार्ड वापर झाल्याची नोंद अपडेट होतेय. अशा नागरिकांचे प्रमाणही राज्यात जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात येतो. राज्यात गरीब लोकांसाठी, गरजू लोकांसाठी सरकार स्वस्त धान्य हे स्वस्त धान्य दुकानांमार्फत अगदी कमी दरात देत असते. याचा लाभ कोणी घेत नसेल तर अशा कुटुंबांनी त्यांचा लाभ सोडावा किंवा लाभ गेल्या अनेक वर्षांपासून घेत नसल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे, असं अहमदनगर पुरवठा विभागाने सांगितले.

अहमदनगर जिल्हा पुरवठा विभागाकडून अशा रेशन कार्डधारकांची एक यादी बनवून त्यासंबंधी काही सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही रेशन कार्डचा वापर करत नसाल तर ते रद्द करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. जेणेकरून इतर जास्तीत जास्त कुटुंबाना रेशनकार्डचा लाभ सरकारडून मिळेल. याआधी काही जिल्ह्यांतही ही मोहीम राबवली गेली आहे. आता हळूहळू काही जिल्हा पुरवठा विभागाने यावर आणखी सक्षम पाऊल उचललं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात धान्य न घेणाऱ्यांची संख्या जवळपास पंधरा हजारांवर असण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, मागील सहा महिन्यांत ज्यांनी धान्य घेतले नाही, असे कार्ड रद्द करण्याची मोहीम प्रत्येक महिन्याला सुरुच असते. कार्ड असूनही धान्य न घेणाऱ्या अनेक नागरिकांचं रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे, असं पुरवठा अधिकारी माळी म्हणाले.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top