पारनेर | महाराष्ट्र दर्शन न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने १० मार्च रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळा हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. या सोहळ्यातील ५१ वधू-वरांचा विवाह हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या थाटातमाटात संपन्न झाला. शरद पवार यांचे हंगे गावात आगमन झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी असलेला तुतारी वादकांचा ताफा खास मुंबईवरून बोलविण्यात आला होता. आमदार निलेश लंके यांनी पवार यांचा चांदीची गदा तसेच मराठमोळा फेटा बांधून स्वागत केले.
लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरिबांच्या मुलांचा विवाह हा थाटामाटात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
कोरोनाच्या भयाण काळातही जनतेला मदत करत त्यांनी पारनेर तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे, महाराष्ट्रचे नाव देशात मोठे केले. कोरोना काळात नागरिकांना मदतीचा हात देत कामाच्या माध्यमातून आमदार नीलेश लंके यांनी नवा आदर्श उभा केला असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले आहे.
आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तसेच निलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने हंगे येथे गुरूवारी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयास उपस्थित राहून पवार यांनी वधूवरांना आशिर्वाद दिले. यावेळी हंगे येथील १९ कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभही पवार यांच्या हस्ते करण्यात आला. माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई लंके, मंजुषा ताई गुंड, संदिप वर्पे, ज्ञानदेव लंके, शकुंतला लंके, दीपक लंके, कारभारी पोटघन मेजर, नगराध्यक्ष विजय औटी, सभापती प्रशांत गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, सभापती डॉ. विद्या कावरे, उपसभापती सुनंदा धुरपते, मधुकर उचाळे, अशोक कटारिया, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, कैलास गाडिलकर, दादा शिंदे, उद्योजक अर्जुन भालेकर, जितेंद्र सरडे, संजीव भोर, सुदाम पवार, सोमनाथ वरखडे, राहुल झावरे, नामाशेठ पवार, सरपंच बाळराजे दळवी, उपसरपंच गणेश साठे, सचिन पठारे, सुहास नगरे, शरद झावरे, संदिप मगर, डॉ. बाळासाहेब कावरे, खिलारी माजी सरपंच राजेंद्र शिंदे, चंद्रकांत मोढवे, शिवाजी शिंदे, विजय डोळ, नंदकुमार देशमुख, अमित जाधव राजेंद्र, चौधरी बापुसाहेब शिर्के, गणेश साळवे, दत्तात्रय निवडूंगे, सत्यम निमसे, किशोर यादव, पियुश गाजरे, राजु सोंडकर, संतोष ढवळे, संतोष गंधाडे, संजय लाकुडझोडे, दौलत गांगड, विपुल सावंत, उमाताई बोरुडे, दिपाली औटी, वैंजयता मते, राजेश्वरी कोठावळे, पुनमताई मुंगसे, सुवर्णा धाडगे, संजय तरटे, सचिन साठे, प्रविण थोरात यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धर्मीयांचे विवाह आयोजित करून आ. लंके यांनी सर्वधर्म समभावाची जपवणूक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आले. लोकांमध्ये अस्वस्थता होती. लोकांची रोजी रोटी बुडाली. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. अशा वेळी पारनेरचा आमदार घरी बसला नाही. रूग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली. स्वतःचा पगार त्यासाठी खर्च केला. लोकांनी दिलेल्या मदतीचेही योग्य नियोजन केले. कोरोनाच्या संकटात हा माणूस घरीही गेला नाही. मी राज्यात फिरतो त्यावेळी लोक मला सांगतात की आमदार लंंके यांना आमच्याकडे पाठवा. संकटकाळात लोकांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा आमचा पारनेरचा सहकारी राज्याला परिचित झाला आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळयाला उपस्थित राहण्याचा निर्णय मी घेतला. कारण निलेशचा कार्यक्रम चुकवायचा नाही हा आमचा निर्णय झाल्याचेही पवार म्हणाले.
कोराना काळात लोक हतबल झाले होते. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी काम करु असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. लोकांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ८०० विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात आली. या सोहळयासाठी पवार साहेबांची उपस्थिती आहे हा भाग्याचा दिवस आहे. पवार साहेबांनी माइयासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदारकीची संधी दिली. कोरोना काळातही पवार साहेबांच्या आशिर्वादामुळे मतदारसंघात तब्बल ५०० कोटी रूपयांचा निधी मिळाला. पवार साहेब यांचे हे ॠण आम्ही विसरणार नाही असेही आ. लंके म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.
प्रत्येक वाढदिवसाला आमदार निलेश लंके स्वप्न पूर्ण !
आ. लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासून मी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहत आहे. पहिल्या वाढदिवसाला विधानसभेची प्रतिमा असलेला त्यांचा केक होता. ते विधानसभेत पोहोचले. आज लाल दिव्याची गाडी असलेला केक आहे, त्यांचे हे स्वप्नही पूर्ण होईल.- मेहेबूब शेख (राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
लंके यांना संधी द्या कळमकर
माजी आमदार दादाभाऊ कळमकर म्हणाले, आ. लंके याचे काम संपूर्ण जगाने पाहिलं आहे. आता त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे अशी विनंती माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद