पारनेर | महाराष्ट्र दर्शन न्यूज
ठाणे पोलीस दलात महिला पोलीस म्हणून निवड झालेल्या पारनेरच्या कु. प्रमिला व कु. आश्विनी आहेर भगिनींचा सत्कार... |
कोरठण - पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील रहिवासी असलेल्या कुमारी प्रमिला बाळासाहेब आहेर व कुमारी आश्विनी बाळासाहेब आहेर या दोघी बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे शहर येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड होऊन सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने कुलदैवत कोरठण खंडोबाचे आशिर्वाद घेण्यासाठी रविवार दि-६/३/२०२२ रोजी दोघींनी देवस्थानला भेट देऊन खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळावे म्हणून कुलदैवतांचे आशिर्वाद घेतले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड यांनी दोन्ही महिला पोलीस बहिणीचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला व पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला व आश्विनी आहेर यांनी सांगितले की आमचे शिक्षण टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालयात झाले असून ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे महाराष्ट्र पोलीस दलात मुलींना संधी उपलब्ध आहेत. मात्र जिद्द व कठोर मेहनत करण्याची इच्छाशक्ती आवश्यक आहे. या प्रसंगी आळे कॉलेज चे प्राध्यापक धनराज आहेर, भाऊसाहेब पुंडे, देवीदास क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद