कोरठण खंडोबा देवस्थानला अहमदनगरच्या रिक्षा चालकाची ११,१११ रुपयांची देणगी!

0

पारनेर | महाराष्ट्र दर्शन न्यूज

कोरठण - पारनेर तालुक्यतील कोरठण खंडोबा देवस्थानला अहमदनगर येथील केडगाव देवी येथे रहिवासी व व्यवसायाने रिक्षाचालक असलेले संदीप रोहिदास ठुबे यांनी रोख स्वरुपात ११,१११ रुपयांची देणगी दिली. 

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड यांनी देणगीदार संदिप ठुबे यांचा शाल व प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी श्री संदिप ठुबे यांनी श्री. कोरठण खंडोबा येथील आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.

कुलदैवत श्री. कोरठण खंडोबा देवस्थानला, अहमदनगर (केडगाव देवी) येथील रहिवासी रिक्षा चालक, श्री संदिप रोहिदास ठुबे यांनी रोख रु. १११११ ची देणगी रविवार ६ मार्च रोजी अर्पण केली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड यांनी देणगीदार संदिप ठुबे यांचा शाल व प्रतिमा देऊन सन्मान केला. मंदिर परिसरात चालू असलेल्या कलर कामासाठी सदर देणगीची मदत होईल असे सांगितले. 

आपण रिक्षा चालवून आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून श्री खंडोबा कुलदैवताला ही देणगी कुटुंबातर्फे देत असल्याचे सांगितले.- श्री संदिप रोहिदास ठुबे (देणगीदार)



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top