पारनेर | महाराष्ट्र दर्शन न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने १० मार्च रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळा हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या विवाह सोहळ्यात ५१ वधू-वर विवाह बंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याचे आयोजन निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था, नव कल्याणकारी महिला संघटना व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.या विवाह सोहळ्याचे आयोजन नीलेश लंके महिला कल्याणकारी संस्था, नव कल्याणकारी महिला संघटना व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा हंगा नगरी सज्ज झाली आहे.
या विवाह सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबर आमदार लंके कुटुंबीय कन्यादान करणार आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणार्या जोडप्यांना संसारपयोगी वस्तूसह इतर सर्व खर्च आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्या दरम्यान येणारा लोकांसाठी भोजन व्यवस्था पार्किंग व्यवस्था व इतर व्यवस्था बाबत काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे.
दिलासा देण्याचा प्रयत्न : आमदार निलेश लंकेकोरोना व शेतीमालाला भाव नसल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे अनेक वधूपिता-वरपित्यांना कोरोना काळात विवाहाची चिंता सतावत आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करून एक छोटासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार नीलेश लंके म्हणाले. १० मार्चला दुपारी ३ वाजता या शाही विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सनई चौघडासह बँड, डीजे व फटाक्यांची आतषबाजीत वधु-वरांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आनंद शिंदेची ‘शिंदेशाही’..आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रात गीताच्या माध्यमातून आपली छाप पाडणारे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या शिंदेशाहीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या शिंदेशाहीच्या कार्यक्रमाची पर्वणी पारनेरकरांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
आमदार नीलेश लंके स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. १५ अपंग जोडप्यांना नीलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेतर्फे या सामुदायिक विवाह सोहळ्यात अंध अपंग १५ जोडप्यांचा विवाह करण्यात येणार आहे. या जोडप्यांना प्रत्येकी एक ग्राम सोने व संसारोपयोगी साहित्य देण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या वतीने व कल्याणकारी संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे. अवघ्या १ रुपयात हा विवाह करण्यात येणार आहे. यास शाही विवाह सोहळ्याचे स्वरूप देण्यात येणार आहे. कोरोनामुळे अनेक गरीब, गरजू, शेतकरी व पालकांना मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कुटुंबियांना पर्याय म्हणून अवघ्या एक रुपयात आमदार नीलेश लंके यांनी तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळा वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद