श्री. कोरठण खंडोबा चैत्र पौर्णिमा उत्सव भाविकांच्या गर्दीने दुमदुमला

0



महाराष्ट्र दर्शन न्युज/श्री क्षेत्र कोरठण/प्रतिनिधी- निलेश जाधव

लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्रावर सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमा उत्सवाला हजारो भाविक भक्तांच्या गर्दीने कोरठण गड दुमदुमून गेला होता. शनिवार दिनांक १६/०४/२०२२ रोजी पहाटे ४ वाजता देवाचे मंगल स्थान व पूजा संपन्न होऊन पहाटे ५ वाजता चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

सकाळी ६ वाजता श्री. गोपीनाथ सुंबरे व सौ. मनीषा सुंबरे तसेच श्री. संभाजी मुंढे व सौ. सुनंदा मुंढे यांच्या हस्ते अभिषेक पूजा व महाआरती झाली. या प्रसंगी श्री. ज्ञानदेव माऊली घुले, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, अक्षय येवले, रामदास मुळे, शांताराम खोसे व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी १० वाजता श्री.खंडोबा देवाच्या उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली. ढोल-ताशांच्या तालावर पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक भक्त सामील झाले होते. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविक पालखी पुढे ओलांडा दर्शन घेत होते. कोरठनगड नगर प्रदक्षिणा करून पालखी विसावा स्थानावरून निघाल्यानंतर पारंपारिक लंगर तोडण्याचा विधी उत्साहात पार पडला. पालखीचे प्रस्थान होऊन पालखी मंदिर पायऱ्यांवर विराजमान झाल्यावर पौर्णिमा उत्साहाची अन्नदाते व पुजारी यांचे कडून पालखीला नैवद्य अर्पण करण्यात आला.



त्यानंतर पालखी मंदिरात परतल्यावर अन्नदान महाप्रसाद वाटप सुरू झाले. कै.भाऊ बजाबा सुंबरे यांचे स्मरणार्थ गोपीनाथ सुंबरे, कै. पंढरीनाथ दशरथ घुले यांचे स्मरणार्थ श्री. रावसाहेब घुले, कै. काशिनाथ बजाबा सुंबरे यांचे स्मरणार्थ श्री. बाळकृष्ण सुंबरे यांच्यावतीने महाप्रसाद नियोजन होते. चैत्र पौर्णिमेला घराघरातून भाविक भक्तांनी कुलदैवताचे कुलधर्म कुलाचार पार पडण्यासाठी देवस्थानच्या सभामंडपात शेकडोंच्या संख्येने जागरण व गोंधळ विधीचे कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने सादर केले. कोरठणगड दिवसभर व रात्रभर जागरण व गोंधळ याच्या निनादाने व जयघोषाने आसमंत निनादला होता.

देवस्थान मध्ये श्री.गणेश मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले तसेच मंदिरातील शके १४९२ मधील मोडीतील शिलालेखाचे मराठीत फलकामध्ये अनावरण मंदिरात करण्यात आले. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, वाहने पार्किंग व दर्शन बारी व्यवस्था नियोजन होती.

पुणे, नगर, नाशिक, मुंबई, ठाणे इत्यादी शहरातून आलेल्या हजारो खंडोबा भाविकांनी चैत्र पौर्णिमेनिमित्त दिवसभर कुलदैवत खंडोबा दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी विश्वस्त बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देविदास क्षीरसागर, सुरेश गुंजाळ, प्रदीप जोशी, शिवाजी ढोमे, तसेच मुंढे परिवार व सुपेकर परिवार पालखीसाठी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top