महाराष्ट्र दर्शन न्यूज | निघोज | प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील वडनेर बु येथील तरुण सुरेंद्र वाजे याचा अपघाती मृत्यू झाला. १२ वी पर्यंत निघोज व त्यापुढील शिक्षण सीटी बोरा कॉलेज शिरूर याठिकाणी पुर्ण केले. अत्यंत गरीब परीस्थितीत शिक्षण घेउन कुटुंबाचा गाडा हा तरुण ओढत होता. मात्र याचे अपघाती निधन झाल्याने या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी सर्व मित्र परीवार व गावकऱ्यांनी दिनांक १५-४-२०२२ रोजी दशक्रिया विधिच्या दिवशी ५०००० निधी जमा करून त्याच्या पत्नीकडे हा निधी डॉ भास्कर शिरोळे, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, युवा उदयोजक राहुल शिंदे यांच्या हस्ते सुरेंद्र वाजे यांची पत्नी आशा वाजे यांजकडे सोपवण्यात आला. यापुढील काळात खंबीरपणे या कुटुंबासोबत राहणार असल्याचे अनिल शेटे यांनी सांगितले.
यावेळी अनिल नर्हे सर, पांडुरंग येवले, दिलीप ढवण, रूपेश ढवण, रमेश वाजे, ग्रामपंचायत सदस्य सनिषा घोगरे, व्हाईस चेअरमन काशीनाथ वाजे, सरपंच गुंडा भोसले, संतोष शिनारे, वाजे गुरुजी, बाबाजी येवले, स्वाती नर्हे, शिवाजी सुकाळे, शिवा पवार, ग्रामसमृदि फाऊंडेशन उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद