आजवर कुणीच दिली नाही अशी ऑफर; अवघ्या 1 रुपयात घरी न्या AC

0



गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या (Summer 2022) तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. राज्याच्या काही भागांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याच्याही पुढे जाऊ लागलं आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी सर्व जण आता पंखे (Fan), एअर कूलर (Air Cooler), एअर कंडिशनर (Air Conditioner) आदी गोष्टींची खरेदी करू लागले आहेत. पंखे, एअर कंडिशनरला वाढती मागणी पाहून अनेक कंपन्यांनी सेल, डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मात्र एका कंपनीनी अशी ऑफर दिली आहे, जी आजवर कुणीच दिलेली नाही.

या महिन्यात LLOYD कंपनी आपल्या निवडक मॉडेल्सवर खूप जबरदस्त ऑफर्स देत आहे. LLOYD ने त्यांच्या AC वर एक फायनान्स ऑफर दिली आहे, जी एकदम भन्नाट आहे. ऑफरच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 1 रुपयात नवा कोरा करकरीत AC घरी घेऊन जाऊ शकता. जी उरलेली रक्कम आहे, ती रक्कम निवांत EMI मध्ये भरू शकता.

ही ऑफर केवळ निवडक LLOYD मॉडेल्स आणि स्टोअर्सवर उपलब्ध आहे. इतर ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, 15 टक्के कॅशबॅक, जुन्या एसीवर एक्सचेंज ऑफर (5000 रुपयांपेक्षा कमी असेल) आणि 4 वर्षांपर्यंतची विस्तारित वॉरंटी दिली जात आहे.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top