राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना राज्याने सर्व निर्बंध शिथिल केले असता आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह (Maharashtra Corona) इतर पाच राज्यांना एक पत्र लिहिलं आहे. केंद्राने लिहिलेल्या या पत्रामध्ये दिल्ली, नोएडा एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 600 हून अधिक नवे रुग्ण आढळल्याने यामुळे तिथला कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 7 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पॉझिटिव्हिटी रेट (Corona Positivity Rate) 8 टक्क्यांच्या पुढे गेल्यानं अलर्ट राहण्याच्या व पंचसूत्रीचं पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने योग्य खबरदारी घेऊन आवश्यक पावलं उचलण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर पॉझिटिव्हिटी दर वाढला तर पुढील काही महिन्यात मास्क सक्तीचा निर्णय राज्य सरकार घेण्याचा अंदाज वर्तवला जातोय.
सध्याच्या घडीला रुग्ण मोठ्या प्रमाणात जरी आढळून येत नसले असं आपल्याला वाटत असलं तरी राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मंगळवारी (19 एप्रिल) 127 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 एवढी झाली तर 108 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. सोमवारी (18 एप्रिल) रोजी राज्यात 59 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर 16 एप्रिलला 98 आणि 17 एप्रिलला 127 नव्या रुग्णांचं निदान झालं होतं.
मुंबईमध्ये मंगळवारी 85 नवे रुग्ण वाढले आहेत, तर सोमवारी 34 रुग्ण वाढले होते. दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोनामुळे मु्ंबईत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्यानं राज्य सरकारकडून महाराष्ट्रात कोरोना निर्बंध हटवण्यात आले होते. 2 एप्रिलपासून राज्यातील मास्कसक्तीसह सर्वच निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर आता वीस दिवसांतच पुन्हा एकदा देशभरात रुग्णवाढीचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे केंद्राने टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यास सांगितले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद