महाराष्ट्र दर्शन न्युज|जामगाव|प्रतिनिधी - निलेश जाधव
पारनेर तालुक्यातील जामगाव या ठिकाणी गावची ग्रामदैवत आई मळगंगा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. समस्त ग्रामस्थ पाहुण्यांच्या उपस्थितीत देवीच्या पालखीची ढोल-ताशांच्या गजरात महिला भगिनींच्या उपस्थित मिरवणूक काढण्यात आली. कोरोना महामारीमुळे भाविकांना माता मळगंगा देवीच्या दर्शनापासून दुरावले होते. परंतु आता भाविकांच्या मनातील मळगंगा देवीच्या दर्शनाची इच्छा मात्र यावर्षी पूर्ण झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
यात्रेसाठी आलेल्या खर्च व भाविक भक्तांनी देवीसाठी दिलेली देणगी त्याचा संपूर्ण लेखाजोखा बोर्डवर दाखवला जाईल यामुळे यात्रा कमिटीचा पारदर्शक व्यवहार ग्रामस्थांना पाहिला मिळेल- लोकनियुक्त सरपंच अरुणा ताई खाडे(जामगाव यात्रा कमिटीचे अध्यक्ष)
या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांमुळे या यात्रेला शोभा आली. म्हणून या यात्रेला पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले या सर्वांचेच सरपंच अरुणाताई खाडे यांनी मनस्वी खूप खूप आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद